सामाजिक
वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य आणि महाप्रसाद वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी- )वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे १३५ व्या जयंतीनिमित्त आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त १०० मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये स्कूल बॅग, वही ,पेन आणि तमाम कार्यकर्त्यांना महाप्रसादाचा वाटप उपविभागीय अधिकारी विलास यामावर , एपीआय निलेश बागव , आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे, सचिन बनसोडे, प्रथमेश पवार , शिवसेना युवा नेता योगेश पवार , पत्रकार चेतन जाधव, पत्रकार मारुती बावडे, पत्रकार स्वामीराव गायकवाड ,राजेश जगताप , रमेश भंडारी , उद्योजक यशवंत इंगळे , शिव बसव डॉ बी आर आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मडीखांबे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आला. गेल्या पाच वर्षापासून या महामानवांची जयंती वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात येत . साडी वाटप , पाणपोईची सोय , खाऊ वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमाद्वारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी केली जाते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे , सम्यक विद्यार्थी आंदोलनचे रविराज पोटे , भारती बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे जयंती उत्सवाचे आधारस्तंभ संदीप बाळशंकर उत्सव समिती अध्यक्ष आकाश गावडे , उपाध्यक्ष महेश बनसोडे ,प्रवीण ढाले , युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे , शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले , तालुका सचिव खाजाप्पा ऐवळे तालुका महासचिव नितीन शिवशरण ‘ तालुका संघटक बबन गायकवाड , तालुका महासचिव संतोष बाळशंकर अमृत सोनकांबळे ,दादासाहेब गायकवाड , यशवंत गायकवाड ,माणिक गायकवाड, संदीप गजदाने, नागणसूर साळुंखे ,शाखा अध्यक्ष गणेश चिनवर जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले , वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर भीम नगर पंचकमिटीचे अर्जुन साळे , कल्याणी घाटगे , उदय सोनकांबळे , दत्ता मडिखांबे , भारत सोनकांबळे , चन्नाप्पा मढीखांबे बसवराज चौधरी , नामदेव मडीखांबे , राहुल रुही , अजय मुकणार , शुभम मडिखांबे , दशरथ मडिखांबे आदी सह मान्यवर उपस्थित होते.






