सामाजिक
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो – नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी श्री
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती च्या सेवा कार्याबद्दल बोलताना सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांना श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास व श्री स्वामी समर्थांच्या ऐतिहासिक व पारंपारीक पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्यास निमंत्रीत केले. यावेळी तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकरराव कवीतके, अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, अक्कलकोचे मंडल अधिकारी जुबेर नदाफ, तलाठी एस.डोईफोडे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, रमेश शिंदे ,
प्रा.शिवशरण अचलेर, श्रीकांत मलवे, विपूल जाधव आदींसह भाविक उपस्थित होते.



