शैक्षणिक

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्व.यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

करमाळा- ( प्रतिनिधी )येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यांच्या प्रतिमेस विद्या विकास मंडळाचे सचिव .विलासराव घुमरे ( सर )यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.राजेंद्र दास यांनी आपल्या मनोगतातून श्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचा आलेख मांडून, यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे उपाध्याक्ष .तात्यासाहेब मस्कर,संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, संस्थेचे विश्वस्त .चंद्रशेखर शिलवंत, मा शिक्षण विस्तार अधिकारी .अनिल बदे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य .संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button