Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महान स्वांतत्र्यवीर  भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा अमर बलिदान दिनानिमित्त वाराणसी येथे कार्यक्रम

Admin by Admin
March 15, 2026
in देश - विदेश
0
महान स्वांतत्र्यवीर  भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा अमर बलिदान दिनानिमित्त वाराणसी येथे कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
                देशाच्या स्वांतत्र्यसाठी आपले अमूल्य जीवनाची बलिदान दिलेली महान स्वांतत्र्यवीर  भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा अमर बलिदान दिन कार्यक्रम २३ मार्च २५ रोजी होणार असून जय भारत माता सेवा समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत हवा  मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्यसानिध्यात यंदा काशी (वाराणशी)  येथे आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास जय भारत माता सेवा समिती सोलापूर शाखाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातून रेल्वे, जीप,क्लोजर सह विविध वाहनातून सुमारे दहा हजार पेक्षा अधिक देशभक्त उपस्थित राहण्या बाबत नियोजन केले आहेत. 
     या कार्यक्रमास महान क्रांतिकारी शहीद स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार असून या मध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या कुटुंबातील सदस्य अमित आझाद तिवारी, भगत सिंग यांच्या कुटुंबातील सदस्य यादविंदर सिंग संधु, राजगुरू यांच्या कुटुंबातील सदस्य, सत्यशील राजगुरू, अशफाकुल्ला  यांच्या कुटुंबातील सदस्य, अलक उल्ला खान, उदम सिंग  यांच्या कुटुंबातील सदस्य, हरपाल सिंग सुनम, झाशी राणी लक्ष्मीबाई यांच्या कुटुंबातील सदस्य, सुनील गोपाल राव, सुखदेव यांच्या कुटुंबातील सदस्य,अशोक थापर, कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या कुटुंबातील सदस्य, सोमशेखर देसाई सांगोली रायण्णा यांच्या कुटुंबातील सदस्य, करवीरअप्पा रगन्ननवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. देश वाशियांचे वतीने राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात येणार आहे. भारतातील सर्व शहीद झालेले क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांचा आदर करण्यासाठी तसेच त्यांचे बलिदान हे कायम स्वरूपी देश वासीयांना सदा स्मरणात ठेवण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित केला आहे.हा कार्यक्रम कोणतीही राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही राजकीय नेत्याशी संबधित नाही. हा कार्यक्रम फक्त शहीद झालेले क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांचा आदर करण्यासाठी व देशभक्ती वाढवण्यासाठी च्या उद्देशाने दर वर्षी साजरा केला जातो. 
    आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, जनतेच्या कल्याणसाठी अनेक जाती धर्माचे हजारो वीर क्रांतिकारकानी  स्वातंत्र्यापूर्वी बलिदान दिले आहे. तसेच सद्या भारत मातेच्या रक्षण करताना शहीद झालेल्या सर्व वीराना शतशः नमन करण्यासाठी २३ मार्च २०२६ रोजी काशी  (वाराणशी) येथे पद्मविभूषण गिरिजादेवि संस्कृतिक संकूल,मकबूल आलाम रोड, चौकाघाट (उत्तर प्रदेश – २२१ ००२) सकाळी ११ वाजता अमर बलिदान कार्यक्रमास सुरवात करण्यात येणार आहे.काशि (वाराणाशि) उत्तर प्रदेश २२१००१ डी. ३५/७७ – जंगमवाडी मठ येथे निवसाची व्यवस्था करण्यात आली असून  अधिक माहितीसाठी आर. के. स्वामी यांचा मो. क्रमांक ९४२२३ २११६६ वर सपंर्क साधावी
चौकट
राष्ट्रीय संत हवा  मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात देशातील सर्व राज्यातील देश भक्त एकत्रित येवून  वेगवेगळ्या राज्यामध्ये गेल्या सात वर्षांपासून अमर बलिदान कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या पूर्वी बंगलोर, दिल्ली,पंजाब येथील भगतसिंग यांचे गांव खटकर कलान येथे, तसेच भारत-पाकिस्तान सीमेवर हुसैनीवाला या गांवी करण्यात आले असून  अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्य नगरीत तसेच गेल्या वर्षी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे अमर बलिदान दिन कार्यक्रम आयोजित केले होते. यंदा मात्र काशी  (वाराणशी) येथे आयोजित केले आहे.
चौकट
     भारत देशासाठी महान कार्य केलेल्या महान व्यक्तीना त्यांच्या जातीमध्ये सीमित करू नये. त्यांना भारत देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी वापरावे. कोणत्याही एका विशिष्ठ जाती धर्मासाठी सीमित करू नये. ते सर्व देशासाठी अमुल्य रत्न आहेत. सर्वांनी त्यांच्या जयंतीचे आचरण करावे. पण एका जाती पुरते करू नये. एकाच जाती, एकाच धर्मा मूळे संविधान वाचवता येत नाही. संविधान व निसर्ग वाचवायचे असेल तर सर्व जाती धर्माची आवश्यकता आहे. देश वाचला तर जाती, धर्म, पक्ष, परिवार, तुम्ही आम्ही वाचतो. देश वाचला नाही तर कोणीही वाचणार नाही.” या विचाराने प्रेरित होऊन, आपल्याला देशासाठी सर्वांगीण एकता साधण्याची आवश्यकता आहे. जात धर्माचा विचार न करता, देशाचा विचार करा. राष्ट्रधर्म सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे.हे लक्षात घेऊन, आपण एकत्र येऊन आपल्या देशाची सुरक्षिता साधावी .  
 _  राष्ट्रीय संत हवा मल्लीनाथ महाराज 
जय भारत माता सेवा समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष नवी दिल्ली
Previous Post

जात प्रमाणपत्र मंजूरीसाठी अडीच लाख रुपयांची लाच घेताना कोकण विभागाच्या उपसंचालकांना अटक

Next Post

पुण्यात पैशांच्या तगाद्यातून नवविवाहितेचा दुर्दैवी अंत

Admin

Admin

Next Post
पुण्यात पैशांच्या तगाद्यातून नवविवाहितेचा दुर्दैवी अंत

पुण्यात पैशांच्या तगाद्यातून नवविवाहितेचा दुर्दैवी अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697