परंडा नगराध्यक्ष पदाचे १० पैकी ८ अर्ज मंजूर तर २ नामंजूर , सदस्य पदाचे १२८ पैकी ३४ नामंजूर तर ९४ मंजूर

परंडा / धाराशिव ( फारूक शेख ) परंडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज छाननीत नगराध्यक्ष पदाचे १० पैकी ८ अर्ज मंजूर तर २ नामंजूर झाले. सदस्य पदाचे १२८ पैकी ३४ नामंजूर तर ९४ मंजूर करण्यात आले आहेत.
परंडा नगर परिषद निवडणुकीचा आखाडा आता रंगात आला आहे. अध्यक्षपद जनतेतून निवडले जाणार आहे तर १० प्रभागातून द्विसदस्यीय पद्धतीने २० सदस्य पदांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची मंगळवारी (दि.१८) छाननी करण्यात आली. शुक्रवारी (दि.२१) अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत आहे. कोण मागे हटणार व कोण लढणार हे त्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना बुधवारी (दि. २६) चिन्ह वाटप होणार आहे. २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुध्द परंडा शहर जनशक्ती विकास आघाडीत दुरंगी सरळ लढत रंगण्याची शक्यता आहे. जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (ठाकरे गट), भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.), काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जनशक्ती शहर विकास आघाडीकडून विश्वजीत पाटिल . कुरेशी, अब्बास मुजावर (अपक्ष) व ज्ञानेश्वर पाटील, माजी नगराध्यक्षा मुख्तार अहमद हावरे (अपक्ष) यांचे नसरीन बाशा शहाबफीर्वाले, इस्माईल अर्ज मंजूर झाले आहेत. सदस्य पदाचे १२८ पैकी ९४ मंजूर करण्यात आले तर ३४ नामंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील सुत्रांनी सांगितली.



