Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नटसम्राट डॉ श्रीराम लागू

Admin by Admin
November 16, 2025
in महाराष्ट्र
0
नटसम्राट डॉ श्रीराम लागू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभिनेता हा चितनशील विचारवंत असला पाहिजे हे शंभू मित्रा यांचे मत डॉ. श्रीराम लागू यांना तंतोतंत लागू पडते. आज दि. १६ नोव्हेंबर मराठी रंगभूमीवरील अनभिषिक्त नटसम्राटाचा आज दि. १६ नोव्हेंबर जन्मदिवस.
१६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून एम. बी. बी. एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले. नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले.१९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते.
पुण्यातील पी. डी. ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली. पी. डी. ए., रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिदु, रुपवेध, आविष्कार, आय. एन. टी. आदि नाट्यसंस्थांच्या सुमारे पन्नास नाटकातून त्यांनी विविध भूमिका केल्या. वेड्याचे घर उन्हात, आधे आधुरे, गिधाडे, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, इथे ओशाळला मृत्यू, उद्ध्वस्त धर्मशाळा, सूर्य पाहिलेला माणूस, किरवंत, मित्र अशा नाटकातील एकाहून एक सरस भूमिका गाजल्या पण नटसम्राट मधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने ते खऱ्या अर्थाने नटसम्राट म्हणून गाजले.
अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. त्यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणाक्य विष्णुगुप्त, किरवंत इत्यादी. कांती मडिया या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच एक होती राणी आणि अॅन्टीगनी या दोन नाटकांचे नाटककार श्रीराम लागू होते. नावापुढे लावलेली डॉक्टरी श्रीराम लागूंनी कधी केली नाही, पण कलावंत म्हणून केलेले काम डॉक्टरेट मिळविण्याइतके महत्त्वाचे आहे. डॉक्टरी करता करता प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनच्या माध्यमातून नाटकात काम करणार्‍या लागूंना मराठी चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला तो व्ही शांताराम यांनी. चित्रपट होता ‘पिंजरा’. यातील मास्तरची भूमिका लागूंनी अजरामर केली. मराठीतील एव्हरग्रीन असा हा चित्रपट. त्यामागोमाग ‘सुगंधी कट्टा, सामना, देवकीनंदन गोपाला, चंद्र आहे साक्षीला, सिंहासन’ आदी यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. प्रत्येक भूमिकेत जीव ओतणे हे लागूंचे वैशिष्ट्य.
मराठीत काम करताना त्यांना हिंदीतही ऑफर आल्या. लागू हिंदीत गेले खरे पण त्यात ठसा उमटू शकेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला क्वचितच आल्या. व्यावसायिक चित्रपटांच्या या दुनियेत कामाच्या समाधानापेक्षा लोकांना काय आवडते हे जास्त पाहिले जाते. लागूंनी त्यामुळेच कामाचे समाधान मिळविण्यासाठी मराठी रंगभूमीची सेवा करणे सोडले नाही. हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. ‘सौतन’ चित्रपटातील वडिलांची भूमिका त्यांच्या कसदार अभिनयामुळे लक्षात रहाते. अनेक मालिकांमधूनही त्यांनी काम केले होते.
लागूंनी पु. लं.च्या ‘सुंदर मी होणार’ मधूनही काम केले. निळू फुलेंबरोबर त्यांचे ‘प्रेमाची गोष्ट…? हे नाटक नुकतेच आले होते. सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारीत ‘ सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटकही वैचारीक वर्तुळात गाजले. शिवाय ‘मित्र’ मधूनही वेगळे लागू पहायला मिळाले.
लागूंच्या पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या ‘झाकोळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध होते. ‘देवाला रिटायर करा’ या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती.
प्रामाणिक विचारांच्या डॉ. लागूंनी विचार स्वातंत्र्य आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी परखड भूमिका घेत विचारांबरोबर आचार ही तसाच ठेवला. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांना दिलेले योगदान विशेष आहे. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन करण्यात आला. तसेच शासनाने पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरविले.
चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राटाने वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळाने पुणे येथे १७ डिसेंबर २०१९ ला या जगाच्या रंगमंचावरुन एक्झिट घेतली.
– योगेश शुक्ल

Previous Post

अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्यावर कुमठे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Next Post

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून रविवारी प्रस्थान 

Admin

Admin

Next Post
 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून रविवारी प्रस्थान 

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून रविवारी प्रस्थान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157258
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697