सोलापूर

देशाचे .सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

सोलापूर ( प्रतिनिधी ) भारत देशाचे  सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ   सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने निषेध व्यक्त करून दोषीवर तात्काळ व, कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी अध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार यांनी .जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात भेटून एका निवेदनाद्वारे केली.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार म्हणाले की; महाराष्ट्र राज्याचा गौरव असलेले मा.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या दालनात झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हा आपले भारतीय संविधान, लोकशाही आणि, न्याय व्यवस्था यांच्या मूळ उद्देशांवरील थेट स्वरुपाचा आघात तथा हल्ला आहे. सर्वोच्च न्यायालय हे देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च ठिकाण असून त्या घटनात्मक दालनात एखाद्या न्यायमूर्तींवर हल्ला करण्याचा हा प्रकार देशाच्या न्यायिक इतिहासातील एक काळा दिवस आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना सध्याच्या काळात देशातील विविध न्यायालयांच्या आवारात घडत असून हल्लेखोरांवर कारवाई नाही झाली तर, समाजामध्ये याबाबत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता याठिकाणी नाकारता येत नाही. म्हणूनच, अशा विचारसरणीच्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी असून सदर घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आहोत. दोषीवर कारवाई नाही झाल्यास नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल म्हणून, ह्या घटनेचा आम्ही पुनःश्च तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करीत आहोत. देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेची प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि, गौरव अबाधित राखण्यासाठी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी. सदरील घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, संघटक रमेश हसापूरे, सिद्राम पवार, सरचिटणीस प्रा.सिद्राम सलवदे, सुदर्शन आवताडे, सोशल मीडिया विभागाचे आनंद मोरे, सेवादलाचे अमिर शेख, दत्तात्रय पवार, मल्लेशी सूर्यवंशी, गेनसिद्ध मोटे, मौलाली शेख, परमेश्वर पौळ, देवेंद्र सैनसाखळे, शिवबाळ मौली, उत्तमकुमार वाघमारे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button