अक्कलकोट ( प्रतिनिधी )
वंचित बहुजन आघाडी ही राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वच जाती धर्मांना जोडण्याचे काम करत आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसी, मुस्लिम , एससी, एसटी यांच्या हक्कासाठी वेळोवेळी भूमिका बजावलेली आहे .भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट, शिवसेनेचे गट यांनी महाराष्ट्राला विकून खाल्ले आहे .हे पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नाहीत . वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे ही राहिली आहे .वंचित बहुजन आघाडी हा पक्ष ठाम भूमिका घेणारा असून अक्कलकोटच्या विकासासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित आघाडीचा झेंडा फडकवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
अक्कलकोट येथील बस स्थानकासमोरील श्री मल्लिकार्जुन मंदिरालगत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची सोमवारी दुपारी युवा यलगार सभा पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा सोलापूर निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे , संतोषकुमार इंगळे , वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विशाल ठोंबरे ,युवक जिल्हाध्यक्ष दीपक पाराध्ये , सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते रवी पोटे ,कामगार आघाडीचे अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे, माजी सरपंच रमेश बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना सुजाता आंबेडकर म्हणाले , देशातील आणि राज्यातील गोदी मीडिया ही सर्व जनतेला मूर्ख बनवत आहे .सध्याची मीडिया ही भाजपाची मीडिया झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने जीआर काढला आहे . पण तो तकलादु आहे. हा जीआर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी फाडून टाकला आहे. सुप्रीम कोर्टात टिकणारे नाही. सरकारने मराठा आरक्षण मागणाऱ्या लोकांची फसवणूक केली आहे. यामुळे याचा विरोध वंचित बहुजन आघाडीने केला आहे.सध्याचे भाजपाचे सरकार हे जाती आणि धर्मामध्ये भांडण लावत आहे .देशातील आणि राज्यातील नागरिकांना धर्माच्या नशेत गुंगीत ठेवण्याचा प्रयत्न सध्या भाजप सरकारकडून चालू आहे. नेपाळमध्ये नुकतेच युवकांनी एकत्र येऊन नेपाळचे सरकार पाडले. त्या ठिकाणी उद्रेक झाला.असा उद्रेक भारतात होण्यास वेळ लागणार नाही.वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम बांधवांसाठी वेळोवेळी आवाज उठविला आहे. एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीने प्रथम आवाज उठविला. गोवंश कायदा विरोधात वंचित बहुजन आघाडीने काम केले आहे. टिपू सुलतान यांच्या फोटोला बाळासाहेब आंबेडकर यांनी हार घातले. तेव्हापासून मुस्लिम युवकांवरील हल्ले बंद झाले. आगामी काळात बहुजन समाजासह मुस्लिम बांधवांना एकत्र येऊन सत्ता मिळवावी लागणार आहे .वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमधील आपल्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडी मध्ये घ्यावे लागणार आहे. या लढाईमध्ये सर्वांना एकत्र घेऊन जावे लागणार आहे .मुस्लिम बांधवांनी आपल्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सोबत राहावे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एक दिलाने सर्वांनी काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवावा. अक्कलकोट तालुक्यातील १५ हजार युवक हे परगावी रोजगारासाठी गेले आहेत. शहराला सात दिवसाआड पाणी येत आहे. अक्कलकोट शहराच्या विकासासाठी इथल्या नागरीकांनी वंचित बहुजन आघाडी सोबत राहावे असे प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी केले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी हा सध्या अक्कलकोट तालुक्यात विरोधी पक्ष आहे. ज्यावेळेस मुस्लिमांवर हल्ले झाले त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेऊन मुस्लिमांवरील हल्ल्यांबाबत सरकारला जाब विचारला होता. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेनंतर मुस्लिमांवरील हल्ले कमी झाले .तुम्ही भाजपाला मतदान केले. तुमचे कल्याण झाले का ? अक्कलकोटचा प्रमुख विरोधी पक्ष केवळ वंचित बहुजन आघाडी आहे. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे रहा. वडार समाज गोसावी समाज व बहुजन समाजाने वंचितला सहकार्य करावे. राज्यात सत्ता येण्यासाठी काम करा. ओबीसींच्या हक्कासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी ही ठाम भूमिका घेणारा पक्ष आहे. ओबीसी समाजासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरची लढाई लढली आहे. ओबीसी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे. आपले आरक्षण वाचविण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी चंद्रशेखर मडीखांबे , विशाल ठोंबरे , डॉक्टर नितीन ढेपे , रवी पोटे ,शिलामनी बनसोडे आदींनी मार्गदर्शन केले.प्रारंभी युवा नेते सुजात आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. या युवा एल्गार सभेस भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष साहिल कांबळे, युवक शहराध्यक्ष संदीप बाळशंकर, नागेश हरवाळकर, प्रकाश शिंदे, अमृत सोनकांबळे, संतोष बाळशंकर, सोपान इंगळे , कृष्णा इंगळे , विजय भालेराव , यशवंत इंगळे , संजय इंगळे , गोविंद इंगळे , गौतम सीताफळे , शंकर इंगळे , सोपान इंगळे , राजकुमार इंगळे , राजकुमार वाघमारे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच अक्कलकोट शहर तालुक्यातील आंबेडकरी व बहुजन समाजातील नागरिक , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.