Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि  सुशोभित रथाची भव्य मिरवणुक संपन्न 

Admin by Admin
July 10, 2025
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि  सुशोभित रथाची भव्य मिरवणुक संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू…! श्री स्वामी समर्थ महाराज की…!, जय जय   घोषात..! श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म, शंखनाद पुणे यांच्या ढोल-ताशा ध्वज पथकांच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक, संभळ, बँड सह छत्रपती शिवाजी महाराजांचा व श्री स्वामी समर्थ महाराजांचा सजीव देखावा, श्री हनुमान देखावा व कोल्हापूर येथील हलगी पथक यांचा खेळ संपन्न झाला. गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३८ वा. वर्धापनदिन मोठ्या उत्साहात मिरवणूकीने सांगता गुरुवारी करण्यात आली.दरम्यान आमदार शिवाजीराव पाटील, चंदगड विधानसभा मतदार संघ जिल्हा कोल्हापूर, संदीप दाजी फुगे-पाटील, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे,   संदिप खर्डेकर- महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपा, अध्यक्ष- उद्यम विकास सह. बँक, विश्वस्त- कर्वे समाज सेवा संस्था पुणे, राहुल वाळंज -अध्यक्ष सह्याद्री क्रिडा मंडळ (न्यास) टिळक नगर चेंबूर, दादाराजे निपाणीकर, बाळासाहेब दाभेकर – अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप  कोल्हे, शैलेश पिसे सोलापूर, अॅड. नितीन हबीब- कायदेशीर सल्लगार, सुरेशचंद्र सूर्यवंशी, दिलीप  सिद्धे, अतुल बेहरे पुणे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात करण्यात आला. 
रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली. 
या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष व संयोजक अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रथ व पालखीला नयनरम्य फुलांनी सजविण्यात आले होते. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून पालखी मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आले.याबरोबरच स्वागत कमानी, डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. मिरवणूक बघण्यासाठी पालखी मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली होती.
याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त अण्णा थोरात पुणे, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, महेश रामदासी, नौशाद भाई शेख, प्रसाद गायकवाड, शाहीद अलीम, सौरभ मोरे,  ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, डॉ.प्रसाद प्रधान, अविनाश मडीखांबे, समीर लोंढे, पद्माकर डीग्गे, प्रविण देशमुख, अँड.संतोष खोबरे, डॉ.विनायक बुधले, अरविंद शिंदे, गणेश भोसले, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, आरतीताई लिंगायत, ऐश्वर्या नागुरे, श्रीकांत झिपरे, शिवराज स्वामी, वैभव मोरे, दिनेश हळगोदे, संजय गोंडाळ, प्रथमेश पवार, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, पिंटू सोनटक्के, सनी सोनटक्के, शितल जाधव, पिंटू दोडमनी, गोटू माने, किरण जाधव, रोहन शिर्के, मनोज इंगोले, योगेश पवार, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबु, दत्ता माने, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, बाळू पोळ, स्वामिनाथ गुरव, गोरख माळी सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, प्रा. मनोज जगताप, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.   
पालखी व रथाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.   
लक्षवेधी मिरवणूक :-श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पालखी व रथ मिरवणुकीसाठी न्यासाने उत्कृष्ट नियोजन केलेले होते. या सोहळ्यास परराज्य, परदेशांतून स्वामी भक्त उपस्थित होते. पालखी व रथ मिरवणुकीत वाद्य वृन्दांची लावलेले क्रम व अमोलराजे लेझीम संघाचा बहारदार खेळ, मिरवणुकीची केलेली मांडणी व पालखीचे भक्तगणांतून कौतुक होत होते. इंव्हेट बाबत अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट नियोजन पाहण्यासाठी राज्यातील अन्य तीर्थ क्षेत्रातील आवर्जून तेथील मंडळीनी या अन्नछत्र मंडळाच्या ३८ व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवास भेटी दिल्या.न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ  धर्मादाय न्यास संस्थेचा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी , सोने चोरीतील आरोपीस अटक करुन १,६०,०००- रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

Admin

Admin

Next Post
करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी , सोने चोरीतील आरोपीस अटक करुन १,६०,०००- रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी , सोने चोरीतील आरोपीस अटक करुन १,६०,०००- रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697