राजकीय
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा वाशी येथील नागरिकांनी शिंदे गटात प्रवेश

परंडा ( फारुक शेख )परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेना महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांनी वाशी तालुक्यातील तेरखेडा व खानापूर गावामध्ये जाऊन सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
अनेक वर्षापासून दुर्लक्षित असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न गेल्या ५ वर्षात केलेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सुधारणा झालेल्या दिसत आहेत. संवाद दौरा दरम्यान ग्रामस्थांनी आजवर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले व सावंत साहेबांच्या विजयचा निर्धार देखील व्यक्त केला.