सामाजिक

श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत  होमिओपॅथिक शिबिर संपन्न

१३७ रुग्णांनी घेतला मोफत शिबिराचा लाभ.
  अक्कलकोट, ( प्रतिनिधी ) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील 
डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले होप फॉर होपलेस या मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिराचा शुभारंभ मंदिर समितीचे व श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विधान परिषदेचे उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते
मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात पार पडलेल्या या मोफत होमिओपॅथिक शिबीरात मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर, मुकबधीर, शारिरीक व्यंग, मानसिक अधू इत्यादी विकारांवर २० वर्षाखालील मुला मुलींची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. सुमारे १३७ रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. प्रारंभी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन व
डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभी शिबिरास सुरुवात झाली.
मुंबईचे डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे तज्ञ संस्थापक डॉ.अंबरीश विजयकर, डॉ.प्रदीप विजयकर, डॉ.तन्मय विजयकर, डॉ.श्वेताली विजयकर, डॉ. क्षितिज जोशी, रजत मालोकर, अभिषेक पवार, आदी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचार तपासणी व मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी डॉ.विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सर्व मान्यवर तज्ञ डॉक्टरांनी या शिबिराच्या माध्यमातून अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागातल्या मतिमंद गतिमंद मुलांकरिता या शिबिरास सहमतीने सहकार्य करत वैद्यकीय सेवेतून स्वामी सेवा केली असल्याचे सांगून यापुढेही वेळोवेळी अक्कलकोट तालुक्यातील मतिमंद गतिमंद मुलांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिबिरांचे आयोजन करीत वैद्यकीय सेवेतून स्वामी सेवा करीत रहावी अशा प्रकारचे मनोदय व्यक्त करत या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवीना राठोड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, अपर्णा सामळ, संतोष फुटाणे-जाधव, राजू भोसले सर, मनोज काळे, श्रीकांत मलवे, रवी मलवे, श्रीकांत कोडलंगरीकर, सागर गोंडाळ, विपुल जाधव, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button