Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न

Admin by Admin
April 28, 2025
in सोलापूर
0
श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
          दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील पालखी मार्गावरून श्री स्वामी समर्थांचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने भावाने संपन्न झाला. 
       तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सायंकाळी ५:३० वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने प्रारंभ झाला. प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर श्री वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, वडगांव, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद, काटगाव आणि कवठा येथून आलेल्या वारकरी दिंडया, ढोल पथक यामुळे पालखी सोहळा रंगला होता. याच बरोबर स्वामी नामाच्या जय जयकाराने सर्व आसमंत दुमदुमून गेला होता. संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले. फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.  समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. स्वामी पुण्यतिथी निमित्त श्रीमंत मालोजीराजे भोसले  व कुटूंबीय, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे, तहसीलदार विनायक मगर, पो.नि.राजेंद्र टाकणे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, बसलिंगप्पा खेडगी,
मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे आदी मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. तसेच पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, दयानंद हिरेमठ, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, अमर पाटील, डॉ.मनोहर मोरे, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, राजेंद्र हत्ते, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे,  श्रीनाथ महानुरे, अक्षय सरदेशमुख, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, मंगेश फुटाणे, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, संजय पवार, प्रसाद सोनार, कौशल्या जाजू, निंगूताई हिंडोळे इत्यादींसह देवस्थानचे कर्मचारी व सेवेकरी उपस्थित होते. 
Previous Post

कोल्हापूरच्या बिरदेवची चित्तर कथा

Next Post

मुळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुपचे लोकार्पण

Admin

Admin

Next Post
मुळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुपचे लोकार्पण

मुळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुपचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697