Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्यामुळेच समाज उच्चशिक्षित – पोलीस उपायुक्त दिपाली काळे 

Admin by Admin
April 24, 2025
in सामाजिक
0
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्यामुळेच समाज उच्चशिक्षित – पोलीस उपायुक्त दिपाली काळे 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाचा वारसा टिकवून ठेवला पाहिजे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. वाचाल तर वाचाल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षण द्या. त्यांच्या पायावर उभे राहू द्या , लग्न करण्याची घाई करू नका. आम्ही जे पोलीस अधिकारी, डॉक्टर , शिक्षक, पोलीस कर्मचारी झालो हे केवळ भाग्य नाही तर शिक्षणामुळे झालो आहोत. हे शिक्षण देण्याचे काम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे. भावी पिढीला अधिकारी बनायचे असेल मोठे व्हायचे असेल तर अभ्यास करा असे प्रतिपादन सोलापूर पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी येथे विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी साजरी करण्यात आली .यावेळी पंचशील समाजसेवा मंडळ हालचिंचोळी कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर पोलीस उपायुक्त दिपाली काळे बोलत होत्या. या कार्यक्रमास सोलापूर सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन डॉक्टर औदुंबर मस्के ,शाखा अभियंता राजेश जगताप , वळसंग पोलीस ठाण्याचे पीएसआय विद्यासागर सोनकांबळे पत्रकार राजेश जगताप ,पत्रकार स्वामीराव गायकवाड , माजी मुख्याध्यापक विश्रांत गायकवाड बक्षीहिपरगे, विपिन सुरवसे , रणजीत भोसले, ग्रामपंचायत सदस्य शालुबाई बनसोडे ,माजी मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे ,बँक ऑफ इंडिया वळसंग कॅशियर नंदकुमार पुटगे , आंबेडकरी चळवळीतील नेते तुकाराम दुपारगुडे , माजी सरपंच मानव कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी सिद्धाराम बनसोडे , मुस्तीचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गौतम चौधरी , सिद्धार्थ बोराडे , माजी सैनिक दयानंद कांबळे ,बक्षीहिपरगे येथील माजी मुख्याध्यापक सुहास गायकवाड आदींसह उपस्थित मान्यवरांचा सन्मान पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचशील समाजसेवा मंडळ हालचिंचोळी तर्फे मानपत्र , सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . तसेच समाजातील जेष्ठ नागरिक श्रीशैल माशाळे, सदाशिव सोनवणे , धानप्पा गायकवाड , बलभीम जैनजांगडे लक्ष्मण इंगळे आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मंडळाचे प्रमुख कुमार वाघमारे जयंती मंडळाचे अध्यक्ष कैलास बनसोडे , सचिव सुनील सोनवणे महादेव बनसोडे , बब्रुवान बनसोडे ,महादेव गायकवाड , भीमाण्णा काळे आदींसह उपासक , उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम दुपारगुडे यांनी केले तर आभार कुमार वाघमारे यांनी मानले.
Previous Post

जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करा  , वंचित बहुजन आघाडी सोलापूर  शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next Post

कोल्हापूरच्या बिरदेवची चित्तर कथा

Admin

Admin

Next Post
कोल्हापूरच्या बिरदेवची चित्तर कथा

कोल्हापूरच्या बिरदेवची चित्तर कथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697