सोलापूर

वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीमध्ये शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष बी जी देशमुख यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीमध्ये शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष बी जी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष बी जी देशमुख यांनी  शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते बी जी देशमुख यांचा सपत्नीक कृपा वस्त्र , प्रसाद प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मराठवाडा विभागीय अध्यक्ष दीपक गिरी यांचाही यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बी जी देशमुख यांनी श्री स्वामी समर्थ महाराजाच्यां दर्शनामुळे मन शांती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजाचें उपदेश हे कायमच संकटातून मुक्ती देतात. राज्यातील ग्रंथालय ग्रंथालयाच्या समस्या सोडविण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून माझा लढा सुरू आहे. श्री स्वामी समर्थाच्यां आशिर्वादामुळे या लढ्याला यश येणार आहे. मंदिर समिती चे चेअरमन महेश इंगळे हे स्वामी भक्तानां चांगल्या सुविधा देण्यासाठी कष्ट घेत आहेत असे बी जी देशमुख यांनी सत्कारा प्रसंगी सांगितले.

 याप्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी , शिवसेना ग्रंथालय सेलचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष देविदास राठोड , सेलचे पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी पत्रकार स्वामीराव गायकवाड , पत्रकार राजेश जगताप , श्रीशैल गवंडी, संजय पवार , प्रसाद सोनार, गिरीश पवार , श्रीकांत मलवे , रुषी लोणारी आदीसह देवस्थानच कर्मचारी , सेवेकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button