माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी योगेश सुळे यांचे निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी )माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पुनश्च एकदा योगेश सुळे यांची निवड करण्यात आली. ही निवड माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केली आहे. योगेश सुळे यांच्या निवडीबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे , माहिती अधिकार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष साहेबांना तेगेळी ,माहिती अधिकार महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हवनुर , सोलापूर शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी , सोलापूर संपर्कप्रमुख माणिक गोसावी , सोलापूर शहर संघटक भीमाशंकर पटणे , वर्षा मेत्रे , लक्ष्मी यादव , संदीप राचेटी, प्रवीण घाडगे, आकाश बबलाद , बसवराज गोरे , समर्थ मसुती , अनिता घोडके आदींनी अभिनंदन करून सत्कार केला. जिल्हाध्यक्ष योगेश सुळे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे सोलापूर जिल्ह्यातील विविध समस्यांवर व भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी आंदोलन उभे करू असे सांगितले. शेवटी आभार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे यांनी मानले.




