Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर येथे जय हिंद फूड बँकेचा नारीशक्ती पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न

Admin by Admin
March 16, 2025
in सोलापूर
0
सोलापूर येथे जय हिंद फूड बँकेचा नारीशक्ती पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
जय हिंद फूड बँकेच्या नारीशक्ती सन्मानाने समाजातील विविध घटकातील महिलांना गौरविण्यात आले. 
समाजसेविका सौ, मोनिका  देवेंद्र कोठे 
व माजी महापौर सौ श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी, संस्थेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार प्राप्त नारीशक्ती यांना गौरविण्यात आले.
आज समाजातील महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते कर्तव्य पार पाडत असतात, महिला हे फक्त चूल अन् मूल एवढ्या पुरते मर्यादित न राहता जागच्या पाठीवर एक स्वतःच्या कर्तृत्वाने अस्तित्व निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले आहे, आज पाहता पृथ्वीवरच नव्हे तर अंतराळात सुद्धा सुनीता विल्यम्स नावाची भारतीय वंशाची लेक जिद्दीने कर्तृत्व गाजवत आहे, 
जगाच्या पाठीवर असे कोणतेही क्षेत्र राहिलेलं नाही, प्रत्येक ठिकाणी महिलांनी सकारात्मक यश प्राप्त केलेलं आहे.खेळ ,वैद्यकीय ,सामाजिक ,आर्थिक
व्यावसायिक ,शैक्षणिक ,शासकीय व प्रशासकीय क्षेत्र
व इतर तळागाळात सेवा देणाऱ्या महिलांचा जय हिंद फूड बँक तर्फे सन्मान करण्यात आला.
या मध्ये प्रतीक्षा काटकर (प्रशासकीय सेवा) ,प्रज्ञा कुमठेकर ( व्यावसायिक )प्रियंका मर्दा कुर्ले ( शैक्षणिक)सान्वी सरवदे ( उद्योजिका)अनिता शिंदे कांबळे ( वन रक्षक वन विभाग)डॉ. सुनीता गायकवाड ( वैद्यकीय सेवा)श्रावणी सूर्यवंशी ( खेळाडू)
मयुरी सपकाळ ( समाजसेविका) माधवी अंदे ( धार्मिक कार्य)माधुरी अंबळकर ( वैद्यकीय)
इंदिरा सामल (अशा वर्कर)लता विटकर (अशा वर्कर )
यांची निवड करून फेटा, शाल, श्रीफळ, सन्मान पत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आला.
महिलांचा कर्तृत्व पाहता त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक त्याग ते करत आले आहेत. या महिला आज जगात सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. महिलांचा फक्त एक दिवस नव्हे तर वर्षभरातील सर्व दिवस महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे असे मत  समाजसेविका सौ मोनिका  देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले.
या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्याचे मनोगत तदनंतर जय हिंद फूड बँकेत सेवा देणाऱ्या सदस्यांच्या परिवारातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याचे नियोजन व सूत्र संचालन जय हिंद फूड बँकेच्या महिला प्रमुख सौ मनाली तमशेट्टी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विक्रम बायस यांनी केला
या कार्यक्रम सोहळा पार पडण्यासाठी  राजश्री तमशेट्टी, प्रा. मृदुला मोहोळकर, सुप्रिया सरवदे, शिल्पा साचणे, पल्लवी गदगे, प्रभावती म्हेत्रे, पूनम गांगजी, सुजाता सरवदे, श्रध्दा सरवदे, अंबर सरवदे, अनिकेत सरवदे, उमेश गायकवाड, सुधीर तमशेट्टी, शुभम बल्ला, अविनाश हंचाटे, विपुल पुल्ली, विनय गांगजी, आकाश तंबाके, आलोक तंबाके, शिवा सुतार, देविदास कवदे, अक्षय कुंदाराम, गणेश चिटमिल, शेखर तमशेट्टी, योगेश तमशेट्टी, व. इतर सदस्यांचा महत्वाचा योगदान लाभला.
Previous Post

आहे तिथच बरं आहे – माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील 

Next Post

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न

Admin

Admin

Next Post
सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697