Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हन्नूर च्या अनंत चैतन्य प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Admin by Admin
February 16, 2025
in शैक्षणिक
0
हन्नूर च्या अनंत चैतन्य प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था ,अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशालेच्या दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. प्रारंभी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  .मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विद्यादेवी सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक  शिवप्पा भरमशेट्टी,.मल्लिकार्जून मसुती उपस्थित होते.यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी कु. सईराणी पवार, स्मिता काळे, अबोली निकम, करिश्मा जमादार व चतुर्दश सुरवसे, ओंकार गावडे या मुलां- मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. व भविष्यात या शाळेकडून मिळालेल्या संस्काराच्या बळावर चांगले उच्च शिक्षण घेऊन या शाळेचे नांव उज्वल करू असे आश्वासित केले.यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी विद्यार्थ्यांना वर्षभर सर्व विषय शिक्षकांकडून आपल्याला मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीच्या जोरावर आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोबल  खचू न देता अत्यंत धैर्याने व मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा असे आवाहन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक. मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे दाखले, उदाहरण व गोष्टी रुपातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संस्थेची स्थापना,प्राप्त परिस्थिती, संस्थेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत केलेल्या प्रगती विषयी  विद्यार्थ्यांना अवगत करत सध्याच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये आपल्याला परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणे कठीण आहे म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी खुप मेहनत करून यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. समीक्षा बाबर,प्रास्ताविक कु. भाग्यश्री स्वामींनी  केले तर आभार कु. करूणा हेगडे हिने  मानले. यावेळी या कार्यक्रमास पर्यवेक्षक . ज्ञानदेव शिंदे व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व दहावीतील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारवड .सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका सौ.शांभवी कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते .सागर  कल्याणशेट्टी,सी.ई.ओ.सौ.रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुक केले.

Previous Post

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५  मार्गदर्शक पुस्तक प्रकाशन 

Admin

Admin

Next Post
महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५  मार्गदर्शक पुस्तक प्रकाशन 

महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५  मार्गदर्शक पुस्तक प्रकाशन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697