महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना प्रकरणी अक्कलकोट येथे काँग्रेस पक्षाचे निवेदन

कर्नाटक राज्यातील कटक चिंचोली गावातील तालुका भालकी, जिल्हा बिदर येथे समतानायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली होती, त्या समाजकंठकावर कठोर कारवाई व्हावी या प्रकारची घटना पुन्हा होऊ नये असे झाल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, कर्नाटक शासनाने त्या समाजकंटकावर कठोरातील कठोर कारवाई करावी असे निवेदन माजी.मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार अक्कलकोट यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मा. सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशपाक बालोरगी, शिवसेना तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, कृ.ऊ.बा.स संचालक इराण्णा धसाडे, कृ.ऊ.बा.स संचालक शिवानंद पाटील, शहर अध्यक्ष(अनुसूचित जातीविभाग काँग्रेस) राहुल मोरे, वसीम कुरेशी, भीमाशंकर सोलापुरे, शिवराज पुजारी, मल्लिनाथ अरवतकल,सलीम शेख,बालाजी शापवाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.