सामाजिक

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे यांची निवड 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या अक्कलकोट तालुका कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते स्वामीनाथ हेगडे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी दिले आहे. सदरची निवड ही दिनांक एक डिसेंबर २०२४ ते पुढील तीन  वर्षापर्यंत राहणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष स्वामीनाथ हेगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. सध्या ते शिवसेना कामगार सेनेचे तालुकाप्रमुख म्हणून काम करत आहेत. स्वामीनाथ हेगडे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यावेळी बोलताना स्वामीनाथ हेगडे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्यांवर आवाज उठविणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button