Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गिरीराज सावंत  यांचा . भूम परंडा वाशी मतदार संघांत गावा गावामध्ये प्रचार दौरा 

Admin by Admin
November 14, 2024
in राजकीय
0
गिरीराज सावंत  यांचा . भूम परंडा वाशी मतदार संघांत गावा गावामध्ये प्रचार दौरा 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परंडा ( फारुक शेख )
२४३ भूम-परंडा-वाशी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे  उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत  यांचा प्रचार सुरु असून, याच अंतर्गत, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा नेते  गिरीराज सावंत  यांनी परंडा आणि भूम तालुक्यातील गणेगाव, हिवर्डा, पाठसांगवी गावांमध्ये प्रचार दौरा केला, ज्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गावागावात घेण्यात आलेल्या बैठकीत . गिरीराज सावंत यांनी तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी प्रा. सावंत यांनी दिलेला ऐतिहासिक निधी, रोजगाराच्या संधी, आणि सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

विकासाच्या दृष्टिकोनातून सावंत साहेबांचे योगदान…

गिरीराज सावंत यांनी स्पष्ट केले की, प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी परंडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून, मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांनी २०२२ मध्ये मंत्रीपद स्वीकारल्यानंतर, या मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी आणला आहे. विशेष म्हणजे, निधीचे वाटप करताना त्यांनी विरोधकांच्या गावांनादेखील मदत केली, दुजाभाव न करता मतदारसंघातील सर्व गावांना विकासासाठी निधी दिला.सर्वसामान्यांसाठी प्रा. तानाजीराव सावंत साहेबांनी सुरु केलेला आशिया खंडातील पहिला फिरता दवाखाना एक आदर्श उपक्रम ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या आरोग्य, शिक्षण, आणि रोजगाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.परंडा मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी, येत्या २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन गिरीराज सावंत यांनी केले. या दौऱ्यात संतोष बाबर, शुभम मोहिते, राहुल भांडवलकर, आप्पा कारंडे, उद्योजक चंद्रकांत सरडे साहेब, भैय्या राजेजाधव गनेगाव उपसरपंच, राहुल इंगोले, उमेश नायकिंदे पाटसांगावी सरपंच, दिलीप नाईकनवरे, हिवर्डा सरपंच तानाजीराव मुंडे, व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. तानाजीराव सावंत यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे मतदारसंघात सर्वांगीण विकासाची स्वप्न पूर्ण होत आहेत. त्यांचे नेतृत्व आणि कार्यक्षमतेमुळे मतदारसंघाचे चित्र बदलत आहे, ज्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Previous Post

माजी.जिल्हाप्रमुख शिवसेना अप्पासाहेब जाधव यांचा रमेश आडसकर यांना जाहीर पाठींबा

Next Post

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा वाशी येथील नागरिकांनी शिंदे गटात प्रवेश

Admin

Admin

Next Post
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा वाशी येथील नागरिकांनी शिंदे गटात प्रवेश

विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा वाशी येथील नागरिकांनी शिंदे गटात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697