राजकीय

विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात पक्षीय कार्यकर्त्यांना आले महत्त्व ! 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ

अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) सध्या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू असून उमेदवारी अर्ज भरणे ,प्रचार करणे यामध्ये सर्वपक्षीय उमेदवार व्यस्त आहेत. या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना महत्त्व आले असून कार्यकर्त्यांचे वजन वाढले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांच्या  कार्यालयात तसेच प्रचार दौऱ्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुती , काँग्रेस महाविकास आघाडी , रासप ,वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्षाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात राजकीय सामना रंगणार आहे. याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सुनील बंडगर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे व अन्य पक्षाचे उमेदवार ही विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. बहुरंगी लढतीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी व काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ग्रामीण भागात प्रचारावर भर दिला असून ते रात्री उशिरापर्यंत कॉर्नर सभा घेणे , कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे , प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधणे यावर भर दिला आहे. रासप आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांनी ही ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधत आहेत. ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्ते हे आता प्रचारात व्यस्त दिसत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानां महत्त्व आले असून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वजन वाढले आहे. भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसत आहेत.आमदार कल्याणशेट्टी यांना कार्यकर्त्यांचा गराडा पडत आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे व रासपचे उमेदवार सुनील बंडगर यांच्या प्रचारातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा काँग्रेस सह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वजन वाढले असून ग्रामीण भागात कार्यकर्ते हे कॉलर टाईप करून फिरत आहेत. या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढले असून सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची रेलचेल वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button