राजकीय
राजकीय नेत्यांवर टिका न करता जनतेच्या प्रश्नांवर जोर देणार – संतोषकुमार इंगळे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )राजकीय क्षेत्रात निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करतात. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत राजकीय नेते टीका करून वेळ मारून नेण्याचे काम करतात. मी जरी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असलो तरी मी कोणत्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारावर टीका करणार नाही. मी केवळ जनतेच्या प्रश्नावर अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत उतरल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अक्कलकोट विधानसभेचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी सांगितले. अक्कलकोट शहरातील श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या बाजूस असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत आळीपाळीने काँग्रेस आणि बीजेपी या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सत्तेवर आहे, परंतु आत्तापर्यंत पाणी , लाईट आणि रस्ते या तीन गोष्टीवर 75 वर्षे उलटून गेले तरीही भूमिपूजन थांबेना आणि यांच्या टक्केवारीमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले. अनेक जिल्हा परिषदचे शाळा बंद पडल्या. बहुजन समाजातील मुलं शाळा शिकण्याचा बंद केले. या ठिकाणी गोरगरिबांना चांगली आरोग्यसेवा पुरवण्यासाठी दवाखाना नाही. मैंदर्गी रोडला जुनी एमआयडीसी आहे. त्याला पुनर्जीवन करून तरुणांच्या हाताला काम देणं आणि शेतकरी बांधवांना नदी जोड प्रकल्प करून पाणी बारा महिने मुबलक करून देणे याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आणि वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी येत्या २८ नोव्हेंबर वार सोमवार रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारीचा अर्ज भरत आहे असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार खंडू इंगळे यांनी पत्रकार परिषदेत केली. लाखो तरुण स्थलांतरीत झालेले आहेत. अक्कलकोट तालुक्यात काम नाही बेरोजगारी प्रचंड प्रमाणात या तालुक्यात आहे त्यावर कळस म्हणजे महागाई भरमसाठ वाढलेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या मालाला हमीभाव नाही म्हणून तो हवालदिल झालेला आहे याच्यावर उपाय करण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे असे संतोषकुमार खंडू इंगळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी प्रास्ताविक केले. या पत्रकार परिषदेला
शहराध्यक्ष विशाल ठोंबरे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता रविराज पोटे गंगाराम गायकवाड उत्तम गायकवाड गौतम गायकवाड राम सोनकांबळे आकाश पाटील संदीप इंगळे संतोष गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.