Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत अर्धनग्न आंदोलन; लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

Admin by Admin
September 27, 2024
in सोलापूर
0
सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत अर्धनग्न आंदोलन; लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर (प्रतिनिधी )
सामाजिक वनीकरण विभागाच्या सोलापूर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराबाबत लहुजी शक्ती सेनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन सोलापुरात सुरू आहे. सोलापूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या मुख्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. काल पुनम गेट समोर संघटनेच्या वतीने सामूहिक केस मुंडन आंदोलन करण्यात आले. आज अर्धनग्नच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले गेले. संघटनेच्या या अनोख्या आंदोलनाची सोलापूर शहर जिल्हयात चांगलीच चर्चा रंगत आहे. 
गेल्या तीन दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलने संघटनेकडून होत असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याने संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सन २०१७  ते २०२३ या आर्थिक वर्षात सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवड, गट लागवड, एनटीपीसी, रस्ता दुतर्फा आदी शासकीय योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकार्यांकडून निवेदनातून करण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यात देखील विविध योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला आहे. त्या संदर्भात गतवर्षी चौकशी समितीने केवळ रस्ता दुतर्फाची चौकशी करून एका वनपालाला जबाबदार धरले. मात्र संबंधीत वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्या कार्यकाळातील कामाची कोणतीच चौकशी झाली नाही. अक्कलकोट तालुक्यातील चार एनटीपीसीची तपासणी, स्थळ पाहणी, अनुदान, त्यावर झालेला सविस्तर खर्च याचा कोणताच अहवाल चौकशी समितीने सादर केलेला नाही. तो सर्व अहवाल मिळावा यासाठी संघटनेकडून तीव्र स्वरूपात विविध प्रकारची आंदोलने पूनम गेट समोर सुरू आहे. 
ह्या आंदोलनास विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव  भोसले, जिल्हाध्यक्ष वसंत देडे,  अण्णा भालेराव, आनंद कांबळे, मनोज कांबळे, अक्की डोलारे, महेश वाघमारे, येडाप्पा कसबे विकास भाऊ डोलारे, सुमित कांबळे, सद्दाम शेख प्रकाश कांबळे,आदि कार्यकर्ते अर्धनग्न आंदोलनासाठी उपस्थित होते.
चौकट:-
सामाजिक वनिकरण विभागाच्या जिल्ह्यातील भ्रष्टाचाराबाबत लहुजी शक्तीसेनेचे सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. संघटनेच्या कायदेशीर मागण्या न झाल्यास लवकरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे संघटनेची ह्याबाबत बैठक लावणार आहे.
(बाळासाहेब मोरे, माजी सदस्य, पंचायत समिती, अक्कलकोट )

Previous Post

महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट

Next Post

भ्रष्टाचार विरोधी जनअक्रोश म राज्य संघटनेच्या माजलगाव तालुका अध्यक्ष पदी सचिन पाडमुख यांची निवड

Admin

Admin

Next Post
भ्रष्टाचार विरोधी जनअक्रोश म राज्य संघटनेच्या माजलगाव तालुका अध्यक्ष पदी सचिन पाडमुख यांची निवड

भ्रष्टाचार विरोधी जनअक्रोश म राज्य संघटनेच्या माजलगाव तालुका अध्यक्ष पदी सचिन पाडमुख यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697