Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापुरात संविधान भवन निर्माण करण्यासाठी पदाधिकाऱ्यानी घेतली खासदार शरद पवार यांची भेट

Admin by Admin
September 25, 2024
in सोलापूर
0
सोलापुरात संविधान भवन निर्माण करण्यासाठी पदाधिकाऱ्यानी घेतली खासदार शरद पवार यांची भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे सोलापुरात संविधान भवन निर्माण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी संदर्भात मान.महेश  कोठे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण समितीच्यावतीने निवेदन दिले.
सोलापुरातील नॉर्थकोटच्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याकरिता एक एकर जागा शासनाकडून मंजूर झालेले आहे परंतु सदर जागेवर फक्त उद्यानच न होता त्या ठिकाणी सोलापुरातील बहुजन समाजासाठी एक दिव्य भव्य अशा प्रकारचे संविधान भवन ज्यामध्ये मल्टीपर्पज हॉल असणार आहे अशा प्रकारचे वास्तु निर्माण व्हावे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण समिती यांच्यावतीने प्रयत्न करण्यात येत होते परंतु गेले तीन वर्षे झाले या प्रयत्नाला यश येत नव्हते तेव्हा आम्ही संविधान भवन निर्माण समितीचे पदाधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर व शहर उत्तरचे नेते महेश कोठे  यांच्या कानावर हे सदरचे गोष्ट सांगितल्यानंतर महेश कोठे यांनी लगेच खासदार शरद पवार  यांची वेळ घेऊन आज रोजी बारामती या ठिकाणी गोविंद बागेत सदर विषयाबद्दल त्यांच्याशी अतिशय फलदायी चर्चा केली. त्याचप्रमाणे खासदार पवार यांनी लगेच संबंधित प्रकरण कुठे थांबले आहे याची चौकशी करून संबंधित खात्याच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा मॅडम यांच्याशी संपर्क केला व सोलापूर मध्ये संविधान भवन निर्माण होण्यासाठी महेश अण्णा यांच्या प्रयत्नातून यशस्वी पाऊल टाकण्यात आले त्याबद्दल श्री महेश अण्णा यांचे संविधान भवन निर्माण समितीच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले तसेच आंबेडकरी जनते मध्ये महेश अण्णा यांच्या बद्दल अतिशय आनंद व्यक्त करण्यात येत असून सदरचे संविधान भवन लवकरच निर्माण होईल अशी खात्री आम्हाला आजच्या भेटीमध्ये निर्माण झालेली आहे. सदरच्या चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण समितीचे अध्यक्ष अशोक जानराव महासचिव राजरत्न फडतरे खजिनदार मच्छिंद्र अंगुले उपाध्यक्ष मधु कांबळे सर तसेच मुख्य निमंत्रक प्राध्यापक सिद्धार्थ जाधव इत्यादी पदाधिकारी महेश कोठे यांना यांच्यासोबत उपस्थित होते तसेच प्रथमेश  कोठे दिनेश शिंदे हे सुद्धा आम्हाला मदत करण्यासाठी उपस्थित होते.

Previous Post

करमाळा येथे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांना सकल मराठा समाजाचे निवेदन

Next Post

इंदापूरच्या कॉलेजला डी. फार्मसीची मान्यता

Admin

Admin

Next Post
इंदापूरच्या कॉलेजला डी. फार्मसीची मान्यता

इंदापूरच्या कॉलेजला डी. फार्मसीची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697