महाराष्ट्र
छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात साजरी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, प्रवक्ते अंबरसिंग चव्हाण, विश्वास सरदार, मिलिंद लहाने आदी उपस्थित होते.