Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री गणेश उत्सव

Admin by Admin
September 8, 2024
in सोलापूर
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री गणेश उत्सव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात पार्थिव गणपतीची सालाबादप्रमाणे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले व त्यांच्या पत्नी अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा, अभिषेक करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध धार्मिक विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्याकडून करण्यात आली.
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, श्रीक्षेत्र अक्कलकोट  येथे सन १९८८ च्या श्री गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या नंतरच्या काळात न्यासाच्या आवारात सन १९९० साली जमिनीची झाडी, झुडपे काढून साफ-सफाई व सपाटीकरण करीत असताना जमिनीच्या मध्यवर्ती भागात शमीवृक्ष आढळला. तेथे सपाटीकरण करते वेळेस श्री गणेशाची सुंदर मूर्ती आढळली. त्याच शमीवृक्षाखाली ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे. 
चौकट :
        या मंदिरात नित्य पूजा अर्चा, अभिषेक, अथर्वशीर्ष अभिषेक (२१ व १०० आवर्तने), सहस्त्र दुर्वार्चन, गणेश याग अशी सेवा करण्यात येते. संकष्टी व अंगारकी चतुर्थीला श्रीक्षेत्र अक्कलकोटातील गणेश भक्तांकडून आरती करण्यात येते. 
या प्रसंगी अमोलराजे भोसले कुटुंबीय तेजस्वीनीराजे भोसले, हर्षवर्धनराजे भोसले, स्वामिनीराजे भोसले व  न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, आप्पा हंचाटे, मनोज निकम, निखील पाटील, अतिश पवार, गोटू माने, प्रविण घाटगे, मैनुद्दीन कोरबू, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, बाळासाहेब घाडगे, अभियंता अमित थोरात, किरण पाटील, राजू पवार, संभाजीराव पवार, पिंटू साठे, दत्ता माने, गणेश पाटील, विश्वनाथ कलशेट्टी, सागर सुतार, शिवू काळे, राहुल इंडे, प्रसाद हुल्ले, सिध्दाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, चंद्रकांत हिबारे, धनंजय निंबाळकर, रमेश हेगडे,  वैजनाथ स्वामी, सुमित कल्याणी, विपुल कदम, धनंजय गोंडाळ, सागर पवार, गोरख माळी, अप्पा गवळी, ज्ञानेश्वर भोसले, योगेश कटारे, कागेश भरमशेट्टी, महेश मलवे, दत्ता झंपले, स्वामिनाथ मलवे, लक्ष्मण पांढरे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

आस्था रोटी बँकेतर्फे गणेशोत्सवनिमित्याने श्रीगणेश मुर्तीचे वाटप

Next Post

रेखा लक्ष्मण सोनकवडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Admin

Admin

Next Post
रेखा लक्ष्मण सोनकवडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

रेखा लक्ष्मण सोनकवडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697