सामाजिक

नरसी शहरात क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी !


नायगाव ( :- सय्यद अजिम नरसीकर )
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 230 वी जयंती आज दि.30 रोजी नरसी येथील लहुजी साळवे नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील इब्राहिम पटेल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे , गंगाधर वडगावे , नजीर बागवान , मधुकर ताटे , माजी सरपंंच एन . डी .नरसीकर , नंदकिशोर नरसीकर ,संजय पाटील शिंदे, पत्रकार गंगाधर गंगासागरे, गोविंद टोकलवाड, पत्रकार सय्यद अजिम नरसीकर, देविदास सुर्यवंशी,मारोती सुर्यवंशी, दिनेश सुर्यवंशी,आदींची उपस्थीती होती.
यावेळी क्रांती पिता लहुजी साळवे यांच्या जीवन चरित्रावर मान्यवरांनी प्रकाश टाकला तसेच जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले प्रारंभी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण भाजपाचे नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जीवन विकास प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष संतोष कुडके , नागोराव कुडके , अशोक कुडके , सावित्राबाई कुडके , गीताबाई डुमणे , दिलीप सुर्यवंशी , गोविंद गायकवाड , साहेबराव सुर्यवंशी, रमेश वाघमारे, आदींनी परीश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button