सामाजिक

अक्कलकोटमध्ये जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) :सर्व जगाला शांतीचे संदेश देणारे शांतिदूत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निम्मित अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजाच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषद उर्दू शाळा क्र.२ कारंजा चौक, अक्कलकोट येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच सोलापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य व कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात तब्बल १७३ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवेत मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे अक्कलकोट शहरात बंदोबस्तासाठी सोलापूर येथून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभाग घेतला यावेळी सोलापूर येथील पाच ते सहा पोलिस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
पोलिसांच्या या सहभागाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
आरोग्य व कर्करोग निदान शिबिरात ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिरासाठी डॉ. तौसीफ मुल्ला, नर्सिंग इन्चार्ज इलाही पठाण, असिस्टंट अॅडमिन ऑफिसर विक्रमसिंह पाटोले, प्रो. नजीर मुजावर, नर्सिंग स्टाफ अमर भगारे, नर्सिंग स्टाफ निकिता पाटले तसेच मेडिकल स्टाफ मॅझ पटेल यांनी सेवा बजावली.
रक्तदान शिबिरासाठी  डॉ.गलीअल, सादिक भाई मुजावर तसेच सिद्धेश्वर रक्तपेढीच्या टीमने मोलाचे सहकार्य केले. 
या सामाजिक उपक्रमास अक्कलकोट शहरातील दातापीर दर्ग्याचे सय्यद शाह दातापीर ,सय्यद शाह मस्तुर दातापीर, सद्दाम शेरीकर,नन्नू कोरबू,मुस्तफा बाळोरगी,रऊफ पिरजादे साहेब,अजित शेख सर,इरफान दावना,समीर शेख,नाविद डांगे,शिकुर शेख,मौलाना इब्राहिम,मौलाना सरफराज,अॅड. फारिया टिनवाला,शबाब शेख,अविनाश मढीखांबे,राहुल ढोबळे,आजम शेखजी,भैय्या नाईकवाडी व पत्रकार स्वामीराव गायकवाड,पत्रकार रमेश भंडारी , अशपाक मुल्ला,आदी मान्यवरांनी भेट देऊन रक्तदान व आरोग्य शिबिराची पाहणी केली. शिबिराचे उत्कृष्ट नियोजन आणि समाजोपयोगी उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
ईद-ए-मिलादुन्नबीचा संदेश केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता मानवसेवा, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा आदर्श या उपक्रमातून देण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी युसुफ कन्नी,आयुब मल्लभारी, सैपन शेख,नूरू जवळगेकर,बाबा शेख,साकिब खिस्तके,अशरफ गोलंदाज, मौला मुल्ला,मुस्तकीम सय्यद, बुडन चाबूकसवार,शब्बीर सुभेदार, इलियास शेख, फिरोज फरास,अकिब बागवान यांनी सहकार्य केले. तसेच रशीद खिस्तके व सोहेल फरास यांनी शिबिराच्या नियोजनासाठी विशेष मोलाचे कार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे,वैद्यकीय पथकाचे, रक्तपेढीच्या टीमचे, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे, शाळेचे मुख्याध्यापकांचे,पोलिस बांधवांचे तसेच १७३ रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button