सोलापूर

कर्नाटक कुमाशी येथे पंडीत भिमण्णा जाधव , मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, कलाश्री जाधव व गायत्री जाधव यांचा सामूहिक सुंद्री वाद्य वादन होणार

सोलापूर – कर्नाटक कुमाशी येथे पंडीत भिमण्णा जाधव , मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, कलाश्री जाधव व गायत्री जाधव यांचा सामूहिक सुंद्री वाद्य वादन होणार आहे.
 -जाधव घराण्याचे ५ व्या पिढीचे प्रचार प्रसारक कु.मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, कलाश्री जाधव हे संगीतप्रेमी कुटुंबातील आहेत. गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट सिद्राम जाधव परतडू तर पंडित चिदानंद जाधव यांचे नातू आहेत.
सद्या तो सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ. १० वी मध्ये मास्टर व्येकटेशकुमार जाधव हा शालेय शिक्षण घेत आहे. तर कु. कलाश्री जाधव सांगमेश्वर महाविद्यालय १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
श्री त्रिविक्रम भारती महासंस्थान आर कुमाशी आणि श्रीमान नरसिंह सरस्वती विश्वरूपा दत्तपादुका क्षेत्र कुमाशी कर्नाटक यांच्या सयुक्त विद्यमाने भारतीय शास्त्रीय संगीताचे वादन व गायन कार्यक्रम वार रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी जगविख्यात सुंद्रीवाद्याचे प्रचार प्रसारक व संवर्धनकार पंडीत भिमण्णा जाधव, मास्टर व्येकटेशकुमार जाधव, कु. कलाश्री जाधव, गायत्री जाधव यांचा सामूहिक सुंद्री वाद्य वादन होणार यांच्या सोबत मैसूरचे पंडीत भिमाशंकर बिदनूर हे तबला वादक म्हणून सहभागी असणार आहेत. त्याचं बरोबर भारतीय शास्त्रीय गायक पंडीत राघवेंद्र भट्ट यांचा कार्यक्रम होणार आहे. यांच्या सोबत श्री. त्रिगुणा पुजारी हार्मोनियम तर पं. भिमाशंकर बिदनूर तबला वाद्य वादनाचे साथ करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button