सामाजिक

अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे . जून महिना  संपत आला तरी अद्यापही थोडा देखील पाऊस  झाला नाही . यामुळे खरीप पेरण्या रखडल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे .   शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे आकाशाकडे टक लावून बसला आहे . खरीप हंगाम २०२५ अतिवृष्टीने गेला आता
  अतिवृष्टीमुळे हंगामाला फटका बसतो की काय अशी स्थिती निर्माण होत आहे .
 अक्कलकोट तालुक्यात शेतकरी वर्ग खरीप पेरणी २०२६ साठी बी बियाणे खते याची जांगजोड करून ठेवलेली आहे . पण यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊसही झाला नाही जुन महिना संपत आहे तरी देखील पाऊसाचा पत्ता नाही . थोडेफार ढग येतात . वारा वाहतो . पण अद्यापही पाऊसाने सुरवात केली नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे . उन्हाळ्यात कशी बशी जगवलेली . केळी ची बाग , ऊस , चिक्कू भाजीपाला टमाटे , वांगी काकडी पत्ता कोबी गाजर , दोडकी मेथी शेपु विहरीतील कुपनलीकेतील पाणी कमी झाल्यान पाऊस लांबल्याने ती जर्गाविणे आता कठिण झाले आहे . हंगामी भाजी पाला पिकवणे देखील शेतकऱ्या ना कठिण बनले आहे जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने बोअर देखील १ तास चालणे ही कठिण बनल्यान ऊस जळून जात आहे . यामुळे ऊसावर अवलंबुन असलेले साखर कारखाने देखील अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही .
 फळ बागायत क्षेत्रातील शेतीही पावसाअभावी अडचणीत आली आहे .
खरीप रब्बी पिक विमा २०२५ बाबत साऱ्यांचे मौन
खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५ करिता अक्कलकोट तालुक्यात शेतकरी वर्गान पिक विमा भरला . अतिवृष्ठीने खरीप हंगाम २०२५ मधील सर्व पिके हातची गेली . माय बाप सरकारने शेतकऱ्याना अतिवृष्ठी बद्दल शासकीय महसुल यंत्रणे मार्फत शेती पिकाचे पंचनामे करून मदत केली . पण शेतकरी वर्गाने पिक विमा भरून ही खरीप पिक विमा २०२५ ची पिक विमा प्राप्त झाला नसल्याने शेतकरी वर्गात पिक विमा कंपनी बद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे . खरीप हंगाम २०२५ पिक विमा मिळण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते रवि डोके ,  विजयकुमार शिंदे , माजी तालुका प्रमुख सोपान निकते, मनोज पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button