राजकीय
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न

मुंबई – टिळक भवन, मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळा पार पडला.
यावेळी डॉ. अनिरूद्ध वनकर यांनी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षाची बांधिलकी अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
डॉ. अनिरुद्ध वनकर यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी अधिक ताकदीने कार्य करण्याचे आवाहन केले. येणारा काळ हा संविधान व लोकशाही संस्थांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात संघर्ष करण्याचा असून, अनुसूचित जाती विभागाने तळागाळातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांचा आवाज बनून काम करावे, असे मत यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी ॲड. गणेश पाटील, . सिद्धार्थ हत्तीअंबीरे, ॲड. संदेश कोंडवीलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




