धार्मिक
खासदार निलेश लंके यांचा अन्नछत्र मंडळात सत्कार संपन्न

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष- अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून अप्रतिम व मोठ्या प्रमाणात स्वामी भक्तांकरिता महाप्रसाद देण्याचे कार्य सुरु आहे. हे कौतुकास्पद असून, भोसले पिता-पुत्र हे समाजासाठी जगणारी माणसे असल्याचे गौरवास्पद मनोगत खासदार व अहिल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅके चे नूतन संचालक-निलेश लंके यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष- अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी न्यासचे पुरोहित विश्वंभर पुजारी, रुद्रय्या स्वामी, अतिश पवार, शुभम सावंत, एस.के.स्वामी, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, दत्ता माने, कल्याण देशमुख, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, राहुल इंडे, विशाल घाटगे, दत्ता मोरे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.



