सामाजिक
खासदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट तालुक्यातील, देवीकवठे, हिळ्ळी व कुडल गावांचा दौरा

ग्रामस्थांच्या समस्या ऐकून सोडविण्याची दिली ग्वाही
अक्कलकोट ( प्रतिनिधी )सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील देवीकवठे, हिळ्ळी व कुडल या गावांना भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी आयोजित गावबैठकीतून स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदने देत विविध समस्या मांडल्या. उजनी धरणातील पाणी अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडावे, देवीकवठे व कुडल येथे बससेवा सुरू करावी, रेशनवरील धान्य नियमित व व्यवस्थित मिळावे, निराधारांचे पेन्शन वेळेवर जमा व्हावे तसेच बंद झालेल्या पेन्शन प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.
खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ठामपणे मांडणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून ती आपण सक्षमपणे पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली. दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे स्वागत करून त्यांना आशीर्वाद दिले.
यावेळी युवा नेते काकासाहेब पाटील, सरपंच काशीबाई संगप्पा कारले, गुंजव्वा जमादार, गंगप्पा सिद्धप्पा पुजारी, चंद्रकांत यादवाड, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, कलावती शिवशरण, निंगन्ना जमादार, उपसरपंच साईनाथ देवप्पा शिवशरण, बसू कोळी, अशफाक मुजावर, संगप्पा कारले, मल्लिनाथ कारले, सिद्धपा पुजारी, जगदीश बाके, सुनीता चव्हाण, पुंडलिक पुजारी, मडीवाळय्या स्वामी, बाबण्णा जमादार, भीमाशंकर शटगार, सिद्धगुंड पुजारी, सांगप्पा बाके, राजशेखर कारले, श्रीकांत मुलगे, शिवराज कोळी, निंगाप्पा भुयारे, जक्कप्पा पुजारी, राजेश राठोड, अण्णाराव भुयारे, परमेश्वर अण्णाराव तडवळ, शिवयोगी पुजारी, मनोहर शिवशरण, गेनबा पुजारी, सीताराम राजपूत, हुसेनी शेख, लालसाब सय्यद, हणमंतू पाचवे, देवप्पा शिवशरण, सिद्धाराम छेत्री, शिवानंद कारले, राकेश वसुरे, प्रदीप बिर्गे, बाबय्या स्वामी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




