जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी दिपक वैद्य, उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य यांची तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची निवड झाली आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी निवड जाहिर करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. त्यांनतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी , निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माजी आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दिपक साळुंखे, गटनेत्या रश्मी बागल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, राज्य प्रांतिक सदस्य शहाजी पवार , भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, यांचे सह सर्व जिल्हा परिषद सदस्य व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री अध्यक्ष व उपाध्यक्षांचे दालनात..!
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व गटनेत्या रश्मी बागल यांचे कार्यालयात जाऊन त्यांना खुर्चीवर बसवून सन्मानित केले. सिईओ कुलदीप जंगम यांनी देखील अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांचे दालनात जाऊन सन्मान केला. 




