Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भयमुक्त वातावरणात मतदान होण्यासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

Admin by Admin
January 3, 2026
in राजकीय
0
सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भयमुक्त वातावरणात मतदान होण्यासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी झाले आहेत. सोलापूर शहरात नेहमीच कोणतीही कटुता न आणता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका लढविण्याची सुसंस्कृत परंपरा राहिली आहे. मात्र, सत्तेच्या बळावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून या परंपरेला काळिमा फासला जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
काल घडलेल्या खूनी हत्येच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती उघड झाली असून, निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात दमदाटी करणे, उमेदवारांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणणे, मारहाण करणे तसेच विविध प्रकारे दहशत निर्माण करणे हे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर शहरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणे व प्रचार करणे अवघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याची झालेल्या हत्येप्रकरणी खुनाचा सूत्रधार व मारेकरी यांच्यातील मोबाईल संवादाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष अजय दासरी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक निंबर्गी, भारत जाधव, युसुफ मेजर, प्रताप चव्हाण, तिरूपती परकीपंडला, अँड केशव इंगळे आदी उपस्थित होते.

तसेच खासदार प्रणिती शिंदे आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Previous Post

मराठी साहित्य संमेलन आणि महात्मा फुलेंची दूरदृष्टी

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

Admin

Admin

Next Post
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157259
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697