महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नरसी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

नायगाव / नांदेड :- ( सय्यद अजिम नरसीकर )
भारतीय संविधानाचे  शिल्पकार , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नरसी येथे फुले शाहू आंबेडकर क्रांतीमंचच्यावतीने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ. क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी बिलोली तसेच उद्घाटक श्रीमती धम्मप्रिया गायकवाड तहसीलदार नायगाव आणि विशेष उपस्थिती मा. रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक रामतीर्थ विजय पाटील जाधव जिल्हा उपाध्यक्ष तलाठी संघटना  गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे सरपंच नरसी. गोविंददादा हानवटे प्रमुख स्वराज्य युथ फाउंडेशन डॉ. शिवकुमार जुकलकर गौतम कांबळे तालुकाध्यक्ष भा.बौ.महासभा डॉ. संतोष मोरे डॉ. विलास मुसळे डॉ. संतोष धुप्पेकर , इब्राहिम बेग पटेल यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी नरसी व परिसरातील नागरिकांनी रक्तदान शिबिर व अभिवादन सभेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन फुले-शाहू-आंबेडकर क्रांतीमंच च्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button