सामाजिक
गुरववाडी सरपंच सौ. लक्ष्मी पुजारी यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारानिमित्त भव्य नागरी सत्कार

अक्कलकोट (प्रतिनिधी )-गुरववाडी, ता.अक्कलकोट
ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२५ प्राप्त झाल्याबद्दल गुरववाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी गुरववाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रशस्त प्रांगणात उत्साहात पार पडला.
या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी (सुक्षेत्र तुप्पीन मठ, नागणसूर-अक्कलकोट)
श्री मडगोंडेश्वर महाराज (सांगोगी बु.ता.अक्कलकोट),श्री यल्ललिंग महाराज (अफजलपूर,, जि. कलबुर्गी) धरेप्पा महाराज(कडबगाव)यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती होती.पाच वर्षांत तब्बल १ कोटी ८ लाखांची विकासकामे गत पंचवार्षिक काळात सरपंच सौ. लक्ष्मी पुजारी व म्हाळप्पा पुजारी यांनी गाव विकासाचा ध्यास घेत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून तब्बल १ कोटी ८ लाख रुपये निधी मंजूर करून गावातील विकासकामे पूर्ण केली.गुरववाडीचे हे कामकाज आदर्श ठरत असून अक्कलकोट तालुक्यातील एकमेव ‘गाव विकास मॉडेल’ म्हणून गावाची ओळख निर्माण झाली आहे. या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर पुजारी दांपत्याचा हा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला.
यावेळी गावातील पूर्ण झालेल्या विकासकामांवर आधारित विशेष डॉक्युमेंटरी चित्रफित ग्रामस्थांना आणि मान्यवरांना दाखवण्यात आली.
या चित्रफितीचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित सर्व पाहुण्यांचा शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या अमृत हस्ते सौ. लक्ष्मी पुजारी व म्हाळप्पा पुजारी यांना शाल–फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि मन:पूर्वक शुभाशीर्वाद देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना नागणसूर तुप्पीन मठाचे डॉ अभिनव बसवलिंग महास्वामी म्हणाले , भारत देश पहायचा असेल तर खेड्यात यावे. खेडेगावाचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास झाला तरच देश राज्य समृद्ध होईल. भारत देश हा ग्रामीण संस्कृती लाभलेला आहे. लोकाच्यां विकासाचा ध्यास घेऊन सरपंच लक्ष्मी पुजारी आणि म्हाळप्पा पुजारी यांनी काम केले आहे. त्यांचे कार्य हे लोकाचां उद्धार करणारे असून ते आदर्श निर्माण करणारे आहे. सरपंच लक्ष्मी पुजारी यांचा राज्यस्तरीय सन्मान झाला. हा सन्मान गुरववाडी ग्रामस्थाचां आहे असे म्हणाले. यावेळी संगोगी ब मठाचे श्री मडगोंडेश्वर महाराज यांनी आशिर्वचन दिले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये
रविकिरण स्वामी(माजी सरपंच व अध्यक्ष, तंटामुक्त समिती गुरववाडी),बसवराज देवरमनी (माजी सरपंच),कल्याणी रावजी (माजी डेप्युटी सरपंच), राहुल पाटोळे,संगप्पा आलुरे,श्रीकांत गुरव, विजयकुमार बोरगाव,निंगप्पा पुजारी,सिद्धाराम पुजारी, श्रीमंत सावळी अर्जुन बहादुरे, शिवाजी रावजी, रमेश स्वामी, काशीराया रावजी, सदाशिव देवरमनी, राजाराम विजापुरे, बसवराज मोसलगी, निगप्पा मोसलगी, सायबणा हळखेड, श्रीमंत पुजारी, बेगेश मोती, कल्याणी साखरे, मायप्पा पुजारी, शिवानंद रावजी, श्रीशैल फुलारी, बसवराज बबलाद, शिवानंद मुंडेवाडी, कल्याणी गंगोंडा, नागणसूर व गुरववाडी जि.प. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, निगप्पा पुजारी, हणमंत पुजारी नाविंदगी, सुबणा टेलर आदींचा समावेश होता.
पत्रकार राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, सिद्धार्थ भडकुंबे,सिद्धाप्पा पुजारी,बिरप्पा पुजारी(पुणे) तसेच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




