सामाजिक
अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतीचीं दुरावस्था

शेतकऱ्यांसमोर शेती दुरुस्तीचे आव्हान !
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने मोठे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतीची मोठी दुरावस्था झाली असून शेतकरी बांधवांसमोर आता शेतीच्या दुरुस्तीचे आव्हान उभे ठाकले आहेत .
अक्कलकोट तालुक्यातील दहा महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. हजारो हेक्टर वरील खरीप पिके , फळबागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी बाधित १० महसुली मंडळात शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत .अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बळीराजा अहवाल दिल झाला आहे. मागील ५० – ६० वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे वयोवृद्ध मंडळी सांगत आहेत. अतिवृष्टीचा फटका हा खरीप हंगामातील पिकांना जसा बसला आहे तसा तो शेतीलाही बसला आहे. अतिवृष्टीमुळे नदी , नाले , ओढे यांना महापुरा आला. या पुराचे पाणी हे शेतांमध्ये गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेतांमध्ये पाणी थांबले असून हजारो हेक्टर मधील शेती या नादुरुस्त झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतातील बांधा फुटून शेतातील माती वाहून गेली आहे .पुराच्या पाण्यामुळे शेतातील मातीही खरडून गेली आहे. अनेक गावात शेतीत पाणी शिरून बांध फुटून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुढील काळात या शेतीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना दोन-तीन वर्ष लागणार आहेत. शेतीच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीची मोठी दुरावस्था झाली असून आता शेतकरी बांधवांसमोर शेतीच्या दुरुस्तीचे आव्हान उभे राहिले आहे.
चौकट –
शासन मदत करणार – अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यांना शासन हे मदत करणार आहे. यासाठी शेतीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर शासनाकडून योग्य ती मदत शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
चंद्रकांत मंगरुळे , तालुका कृषी अधिकारी अक्कलकोट.