Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर

Admin by Admin
August 28, 2025
in महाराष्ट्र
0
देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता सडकून टीका केली आहे. देशात सध्या सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाचा अभाव असल्याचं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सनातन हिंदुत्ववाद्यांचे पंतप्रधान आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्यावरही टीका
आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाल, राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा हाती घ्यायला हवा होता. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की, सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाची कोणतीही माहिती नाही. त्याबाबतचे चित्रीकरणही उपलब्ध नाही. त्यामुळे सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि राहुल गांधी चुकीच्या व्यवस्थेविरोधात लढत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात ॲड . प्रकाश आंबेडकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘जरांगे हे रयतेतील मराठ्यांसाठी लढत असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात त्यांचे राजकारण निजमाताली मराठ्यांसाठी चालले आहे. रयतेतील गरीब मराठ्यांसाठी लढा उभारण्याची संधी त्यांना गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. मात्र त्यांनी ती गमाविली. स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून त्यांना आरक्षण मिळविता आले असते. लोकांच्या उत्साहाला जोर देण्याएवेजी ते पुन्हा लढ्याची भाषा करत आहेत.’
आंबेडकरी चळवळीतील नेते एकत्र आहेत. मात्र ते वीस वर्षे सत्ताधारी होऊ शकणार नाहीत. समाजातील एक वर्ग वंचितांना कधीच मतदान करणार नाही. हा वर्ग तीस टक्के आहे. वंचित समाजाचा प्रतिनिधी निवडून आला तर स्पर्धक वाढले, हे त्यामागील कारण आहे. ही परिस्थिती बदण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्याला अजून अवधी लागणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्षे सत्ता लांब असेल, असा दावाही प्रकाश आंबडेकर यांनी केला.
Previous Post

प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते : – न्यायाधीश घुगे

Next Post

खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे येत्या १५ ऑक्टोबर रोजी देशभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Admin

Admin

Next Post
खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे येत्या १५ ऑक्टोबर रोजी देशभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे येत्या १५ ऑक्टोबर रोजी देशभर आंदोलन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157272
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697