महाराष्ट्र

आजाद समाज पार्टी पुणे जिल्हा प्रभारी भाई रहिम एम. सय्यद यांची नियुक्ती

पुणे ( अशोक शिवशरण )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जाणारा पिंपरी चिंचवड शहरांची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना भाई रहिम सय्यद यांनी महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा चिंचवड विधानसभा व मावळ लोकसभा निवडणुकीत पक्ष मैदानात उतरवुन पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात पक्षाची दखल घेण्यास भाग पाडले विविध आंदोलने व सार्वजनिक हिताची कामे करत त्यांनी शहरात पक्ष बांधणी केली त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्ठिनी त्यांची पुणे जिल्हा प्रभारी पदी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. मानसी  पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ मानसी पवार म्हणाल्या की भाई रहिम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटन आणखीन मजबूत होईल त्यांच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील अनुभवाचा व कार्याचा फायदा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच होईल व पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद व महानगरपालिका सभागृहात जातील अशी अपेक्षा ठेवत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा अध्यक्ष भिमराव कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुरज गायकवाड तसेच पिंपरी चिंचवड  महिला अध्यक्षा अनिता रिडलान, राहुल कुमार सुरज जाटव सतीश टोपे संदिपजी, चंद्रशेखर व इतर‌ पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button