राजकीय
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या , उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचे सोलापूर विमानतळावर अक्कलकोट कॉंग्रेसच्यावतीने स्वागत

अक्कलकोट ( प्रतिनिधी )- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या , उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचे सोलापूर विमानतळावर अक्कलकोट कॉंग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्षा डॉ सुवर्णा मलगोंडा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.इंडी येथीलआमदार यशवंतगौडा पाटील यांच्या मतदार संघातील विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यासाठी ते आले होते .अक्कलकोट तालुका हा गडीनाड तालुका असल्याने येथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व इन्जिनीअरिन्ग मध्ये प्रधान्याने प्रवेश देण्यात यावा अश्या प्रकारचे निवेदन डॉ . सुवर्णा मलगोंडा यांनी दिले .याप्रसंगी सोलापूर शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष चेतन गरोटे ,जिल्हा उपाध्यक्ष अशपाक बळोरगी ,माजी जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.



