सामाजिक
नागणसूर मठात समर्थ बिराजदार यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
नागणसूरचे श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या ९२ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट माहिती अधिकार शहर अध्यक्ष समर्थ गुरुलिंग अप्पा बिराजदार यांनी महास्वामीजी आशीर्वाद घेतले. यावेळी माहिती अधिकार शहर अध्यक्ष समर्थ गुरुलिंगप्पा बिराजदार यांचा मठाधिपती डॉ अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी शाल हार श्रीफळ व महास्वामीजींचां फोटो देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची उपस्थिती होती.