Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार – ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी

Admin by Admin
June 3, 2025
in राजकीय
0
काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार – ज्येष्ठ नेते अश्पाक बळोरगी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : (प्रतिनिधी)काँग्रेसची 140 वर्षांची वाटचाल आहे.तर म्हेत्रे कुटुंबीय व काँग्रेस यांच्याबरोबर गेल्या 40 वर्षापासूनचे संबंध आहेत, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, कै सातलिंगप्पा म्हेत्रे, माजी आमदार कै. महादेवराव पाटील, व सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली काम केलेले आहोत. आजवर काँग्रेस पक्षाने मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिले आहे हे विसरणे अशक्य आहे. त्यामुळे मी यापुढे सुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगून भविष्यात काँग्रेस पक्षाने मला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध राहणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी यांनी  सांगितले.काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी वागदरी रस्त्यावरील बळोरगी फार्म हाऊस येथे मंगळवारी  पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.सदरची पत्रकार परिषद ही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष अशपाक बळोर्गी यांनी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दि.5 जून रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पुढील काळात तालुक्यातील काँग्रेस याबाबतचे विवेचन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

काँग्रेस आय ने म्हेत्रे कुटुंबीयांना भरपूर काही दिले आहे, मात्र ते आज पक्ष सोडत आहेत, आम्ही मात्र काँग्रेस सोडणार नाही, या पुढील काळात गाव, वाड्या, वस्त्या, तांड्यांपर्यंत पोहोचून काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणार.. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या पुढील काळात काँग्रेस पक्ष बांधणीसाठी सर्व समाजातील सर्व जाती-धर्मातील कार्यकर्ते व लोकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे असे यावेळी अशपाक बळोरगी यांनी सांगितले.

पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार आहेत. या काळात काँग्रेस पक्ष कोणाबरोबर सुद्धा युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहेत असे सांगून तालुक्यातील इतर पक्षातील मातब्बर नेते मंडळी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत लवकरच काँग्रेस पक्षाची सभा घेऊन यामध्ये प्रवेश करणार आहेत. दिनांक पाच जून रोजी लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन व काँग्रेसची मोठ बांधण्याचा चंग या निमित्ताने करणार आहोत असे अश्पाक बळोरगी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस सुनील खवळे, ताजुद्दीन मोगल, बाबू नागुरे, सैपन खान चोपदार, एजाज बळोर्गी, फारुक बबरची, रफिक पठाण, बब्बू होटगी, मुस्तफा बळोर्गी, समर्थ मातोळे आधी जण उपस्थित होते.

 

Previous Post

परंडा बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन संपन्न

Next Post

माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे  अक्कलकोट तालुक्याचे लक्ष

Admin

Admin

Next Post
माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे  अक्कलकोट तालुक्याचे लक्ष

माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे  अक्कलकोट तालुक्याचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697