सामाजिक

अक्कलकोट लायन्स क्लबचे नूतन  पदाधिकारी यांचा पदग्रहण व शपथविधी समारंभ संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) लायनेस्टिक वर्ष २०२५-२०२६ चे अक्कलकोट लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष अभय खोबरे व त्यांचे पदाधिकारी यांचा पदग्रहण व शपथविधी समारंभ मोठ्या शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
   येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभास शपथविधी अधिकारी म्हणून एमजेएफ ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके उपस्थित होते. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले,माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले,सचिव शामराव मोरे,विश्वस्त भाऊसाहेब कापसे,संजयलाला राठोड,माजी प्रांतपाल राजशेखर कापसे,माजी प्रांतपाल अरविंद कोणशिरसगी,लायन्स शाळेचे चेअरमन राजेंद्र हत्ते,रिजन चेअरमन श्रीनिवास कटकुर,झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती,नूतन अध्यक्ष अभय खोबरे,नूतन सचिव शिरीष पंडित,नूतन खजिनदार विठ्ठल तेली आदी उपस्थित होते. प्रारंभिक मान्यवरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मावळते अध्यक्ष शिवानंद नंदर्गी यांनी प्रास्ताविक केले. मावळते सचिव यांनी सेवाकार्याचे अहवालाचे वाचन केले.
   शपथविधी अधिकारी ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी नूतन पदाधिकारी प्रथम उपाध्यक्ष चेतन जाधव,द्वितीय उपाध्यक्ष कल्याणी आळगी,तृतीय उपाध्यक्ष राजेंद्र कारिमुंगीं,सहसचिव शिवशरण खुबा, सखजिनदार मंदार पुजारी,टेमर कमल अल्लोळी,टेल ट्विस्टर गौरीशंकर चनशेट्टी,लाइन्स क्वेस्ट सुभाष गडसिंग,जीएलटी महबूब सलगर,जीएमटी शदीद वळसंगकर,जीएसटी सुनील बिरादार,क्लब मार्केटिंग राजशेखर हिप्परगी,डॉ.प्रदीप घीवारे,पीआरओ सिद्धया मठ ऍक्टिव्हिटी चेअरमन सुधीर माळशेट्टी,चार्टर मेंबर डॉ.अरुण परिचारक व संचालक मंडळ सदस्यांना शपथ दिली व आगामी वर्षातील जबाबदारीची जाणीव करून दिली.
   १९७१ पासून ग्रामीण भागात कार्यरत असणारे अक्कलकोट लायन्स क्लबचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून नूतन पदाधिकाऱ्यांना माझे सहकार्य असेल असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी लायन्स क्लब सामाजिक कार्य करणारी संस्था असून त्यांच्या सामाजिक उपक्रमास माझे भरीव सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,लायन्स स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र हत्ते यांनी मनोगत व्यक्त केले.
     या कार्यक्रमास मावळते सचिव डॉ.सुनील बिरादार,शिवपुत्र हळगोदे,प्रभाकर मजगे,मल्लिनाथ साखरे,प्रकाश उन्नद,चंद्रकांत वेदपाठक,महेश हिंडोळे,संतोष जीरोळे,बाबासाहेब निंबाळकर,सुभाष खमीतकर,अभिनंदन गांधी,प्रवीण शहा,अरविंद शिंदे,प्रशांत शिंदे, धनंजय गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार प्रदर्शन शिरीष पंडित यांनी मानले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button