महाराष्ट्र
राज्यात ढगाळ वातावरण ,कुठे पाऊस कुठे गारपीट होणार?

पुणे – राज्यात ढगाळ वातावरण असून मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात आणि काही ठिकाणी आज गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासह काही भागात पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या येलो अलर्ट दिला आहे. त्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होऊ शकते तसेच आगामी दहा मे पर्यंत तापमान घसरलेलेच राहील या काळात पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान, सातारा जिल्ह्यात 7 मे रोजी गारपीट आणि वादळी पावासाची शक्यता असलाने इथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील.
पुण्यातही गारपिटीची शक्यता आहे. पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असे सांगण्यात आले तर मुंबईतही सध्या पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार सध्या पालघर जिल्ह्यातल्या बोईसर सह अनेक भागात वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या अनेक मच्छीमार बोटींचे नुकसान झाले आहे.
