सामाजिक
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचां सन्मान

अक्कलकोट (प्रतिनिधी )राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचां सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक राठोड , प्रगतशील शेतकरी शिवानंद बिराजदार,
वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र बनसोडे,डॉ.सतीश बिराजदार,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप ,फकीरा दलाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पारखे व परिवर्तन कुष्ठरोग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ ढगे,विश्वनाथ चव्हाण, अजित राठोड सिद्धाराम गंगोंडा,गुरप्पा गंगोंडा,अनिल इंगळे,अश्पाक मुल्ला,सिद्धू पुजारी,औषध निर्माता ईरण्णा चिंचीगोडे व गंगाराम राठोड आदीची प्रमुख उपस्थिती होती. लोकनेते स्व वहिदपाशा पाटील प्रतिष्ठान व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पीरपाशा पिरजादे पाटील यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा फेटा शाल व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.प्रत्येक यशस्वी माहिला व पुरुषाच्या मागे आईचा भक्कम हातभार असतो, माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण आई – वडिलांच्या आशिर्वादाने अंगणवाडी,कॉलेज पासुन नोकरीच्या उंबरठ्यापर्यन्त व नोकरीच्या अनोळखी क्षेत्रात उतरण्याचे धाडस करून अनेक अडचणींवर मात करून ते नोकरीत यशस्वी झाले.त्या यशामागे आईचा भक्कम आशिर्वाद कारणीभूत असतो,असे मार्गदर्शन अक्कलकोट ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड यांनी केले.
यावेळी सुप्रिया कबसे,पायल वानखेडे,मनीषा सलगर,निकिती पुजारी,प्रमिला वाघमारे,सुरेखा वर्दे,
नागम्मा नंदे,ललिता चिंचोरे,हरणाबाई बंदपट्टे,सरस्वती तळभंडारे,गीता चिंचोळकर,जानकी कामठी,वंदना जाधव,संजीवनी सूर्यवंशी या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेक महिला कर्मचाऱ्यानी मनोगत व्यक्त केले.