भारतीय बौद्ध महासभेकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय बागेहळळ रोड येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमास मेजर कमलाकर कांबळे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सोलापूर, ज्येष्ठ नेते दिलीप कदम ,प्रवक्ते, राजकुमार बनसोडे तालुका प्रवक्ते, श्रीशैल शिवशरण तालुका कोषाध्यक्ष, सिद्धाराम घटकांबळे जिल्हा संघटक, दत्ता कांबळे तालुकाध्यक्ष, शंभू देव सूर्यवंशी, मुख्याध्यापिका सिद्धवा शिवशरण , भीमाशंकर घटकांबळे, आकाश गायकवाड तालुका संस्कार प्रमुख, दिलीप शिवशरण, अनिल बनसोडे, कृष्ण धोडमणी, सैदप्पा झळकी जिल्हा उपाध्यक्ष आर पी आय, चंद्रकांत शिंदे, मालकांण्णा सोनकांबळे, दोडमनी सरपंच आंदेवाडी, मेहंदिमिया जिडगे आर पी आय शहराध्यक्ष दुधनी, शिवशंकर गुंजले आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते छत्रपती शिवरायाच्यां मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते दिलीप कदम , सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे मेहंदिमिया जिडगे सैदप्पा झळकी मुख्याध्यापिका सिध्धव्वा शिवशरण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.