शैक्षणिक

जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल परंडा येथे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

परंडा / धाराशिव (फारूक शेख )परंडा येथे
जि प उर्दू प्रशाला व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स येथे दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुजावर समीर अबरार हे होते तसेच बागवान तबस्सुम व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते .
प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक  रऊफ खान व  दिनकर पवार  उपस्थित होते. तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते शाळेचे मुख्याध्यापक  खतीब ए. ए यांनी सर्व प्रमुख पाहुण्याचे पुष्प देऊन स्वागत केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका दखनी समीना  यांच्यातर्फे गिफ्ट देऊन दहावी व बारावी वर्गातील आदर्श विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी निरोप समारंभ बाबत भाषणे केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती दखनी समिना बांगी जमील, नितीन लोधवाल महेंद्र शिंदे अंजली चंदनशिवे निलोफर अमरीन
यांचे सहकार्य लाभले.
मुख्याध्यापक खतीब  यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button