सामाजिक
आमदार व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांची अन्नछत्र मंडळास भेट

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून गरीब व गरजूना अन्नदान केले जाते ही बाब उल्लेखनीय असून पवित्र सेवाभावी कार्य घडत असल्याचे मनोगत आमदार व मुंबई जिल्हा मध्यवतीॅ सहकारी बॅकेचे अध्यक्ष (मुंबै बॅक ) प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मुतीॅ, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी तते बोलत होते. त्यांच्या समवेत मिलन कल्याणशेट्टी ,महेश हिंङोळे,नननू कोरबू हे उपस्थित होते.
यावेळी उपाधयक्ष अभय खोबरे,पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, , धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी,महांतेश स्वामी,कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.