परंडा ( फारूक शेख )परंडा पोलिस ठाण्याने १२. नोव्हेंबर २०२४ रोजी पोलीस ठाणे परंडा च्या वतीने आगामी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस ठाणे परंडा हददीत कायदा व सुव्यवस्था अबादीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी, भूम गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विनोद इज्जपवार, सहा. पोलीस निरिक्षक शंकर सुर्वे, सहा. पोलीस निरिक्षक प्रविण क्षिरसाठ, पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब खरात व पोलीस हवालदार, गजानन मुळे, विश्वास शिंदे, नितिन गुंडाळे, जिज्ञासा पायाळे, विशाल खोसे यांचे सह पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस अंमलदार यांनी आदर्श आचार संहिता काळात दिनांक १५.१०.२०२४ रोजी ते दिनांक ११.११.२०२४ रोजी पावेतो महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत एकुण १८ गुन्हे दाखल करून ३३२ देशी दारू बाटल्या, ३४० लिटर गावठी हातभटटी दारू, १९५० लिटर गुळ मिश्रीत रसायन असे एकुण २, लाख १६ हजार ८१०/रूपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.





